Breaking News

नवरत्न पुरस्काराने समतादूत मोहसिन खान सन्मानितबुलडाणा,(प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव गांधी भवन बुलडाणा येथे 30 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना नवरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सेवाधिकारी के.एस.वाकोडे हे होते. बार्टी संस्थेचे समतादूत मोहसिन खान बिसमिल्ला खान हे  चार वर्षांपासून अनु. जातीसाठी असलेले  असलेल्या विविध योजना, विविध उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहचविणे. तसेच समाजात समता निर्माण करणे, आदी कार्य चिकाटीने व प्रामाणिकपणे करीत आहे. या कार्याची दखल घेत त्यांना नवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, माजी आमदार विजयराज शिंदे, जि.प. सदस्य  डि. एस. लहाने, बुलडाणा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेशभाऊ शेळके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, ग्रामगीता पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे. हा नवरत्न पुरस्कार तिसरा असून या अगोदर त्यांना ’दिव्यज्योत’ व ’कला गौरव’ या दोन राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मोहसिन खान यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.