Breaking News

प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नाने गावांच्या विकासकामांसाठी निधी मंजूर


जामखेड ता/प्रतिनीधी 
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जामखेड तालुक्यातील गावामध्ये मुलभूत सुविधा व विकासकामांसाठी पाच कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजूरी दिली आहे.

गावांतर्गत मुलभुत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक लोक प्रतिनिधीकडून प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होत असतात. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुचविलेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांच्या मुलभूत विकासासाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षात नगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील 77 विविध विकास कामांसाठी 5 कोटी रक्कमेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वित्त विभागाने मंजूर निधीच्या 70 टक्के मर्यादेत निधी वितरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर यांना उपरोक्त मंजूर निधीच्या 70 टक्के प्रमाणे 3 कोटी 50 लाख इतका निधी वितरीत करण्यात येत आहे.

जामखेड तालुक्यातील-चोंडी येथील जि.प.प्रा.शाळा कंपाऊंड बांधणे (10), रत्नापूर येथील स्मशानभूमी अंतर्गत पेविंग ब्लॉक बसविणे(04), महारुळी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे (10), जातेगांव ते काळेवस्तीरस्ता काँक्रीटीकरण करणे (05), तरडगांव येथे घाट बांधणी करणे (10), दौंडाचीवाडी येथे मारुतीमंदीर रस्ता काँक्रीटीकरण करणे (07), पिंपळगांव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे (10), आपटी येथे स्मशानभूमी बांधकाम करणे (07), पिंपळगांव ऊ येथे चान्नाप्पा मंदीर कंपाऊं डबांधणे (05), तेलंगशी येथे जि.प.प्रा.शाळा कंपाऊंड बांधणे (10), मौजे खर्डा ता. जामखेडयेथे बस स्थानक ते खडकपुरा चौक रस्ताकाँक्रीटीकरण करणे (30), मोहा (हापटेवाडी) येथे सभामंडप बांधणे (05), मोहा (रेडेवाडी) येथेसभामंडप बांधणे (05), रत्नापूर (सांगवी) येथे गावअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे (07), सतेवाडीयेथील मारुती मंदीर सभामंडप बांधकाम करणे (04), चोभेवाडी येथील गाव अंतर्गत सभागृह बांधणे (10), जवळके येथील ग्रामपंचायतसमोरील जागेत पेविंग ब्लॉक बसविणे (05), नायगाव येथील आनंदवाडी नायगाव रस्ता तेमारुती मंदीर रस्ता काँक्रीटीकरण करणे (10), नागोबाची वाडी येथे भगवान बाबा मंदीरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे (05) अशा विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील नागरिकांनी पालकमंत्री राम शिंदे यांनी कामाची मंजूरी आणल्या बद्दल अभिनंदन केल आहे.