Breaking News

अनाथ प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव द्यावेत


सातारा (प्रतिनिधी) : मान्यताप्राप्त शासकीय व स्वयंसेवी संस्थेतील शून्य ते 18 वयोगटासाठी कार्यरत अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमध्ये दाखल अनाथ असलेल्या मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणार आहे.

माहे डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत जिल्ह्यातील कार्यरत सर्व शासकीय, स्वयंसेवी बालगृहाच्या दत्तकास पात्र असलेल्या प्रवेशित सोडून इतर पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्याकडे सादर करावयाचे आहे. या अनुषंगाने संस्थेतून बाहेर पडलेल्या अनाथ प्रमाणपत्रास पात्र प्रवेशितांनी ज्या संस्थेतून मुदत संपवून बाहेर पडले त्यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव संस्थेकडे सादर करावेत, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी रोहिनी ढवळे यांनी केले आहे.