Breaking News

बनावट एटीएमव्दारे दीड लाख रूपये लंपास


राहाता/प्रतिनिधी
 राहाता येथील वकील व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एटीएम कार्डचे क्लोन बनवून एटीएम कार्डचा गैरवापर करीत अज्ञात चोरट्याने 1 लाख 46 हजार रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली. याबाबत अहमदनगर येथील सायबर सेलला अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
             याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहाता येथील वकील मोहनराव रावजी गाडेकर व त्यांच्या पत्नी माधुरी मोहनराव गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पती पत्नींचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राहता शाखेत खाते आहेत पती-पत्नी दोघांकडेही एटीएम कार्ड आहेत. दि. 28 व 29 डिसेंबर 2018 रोजी मोहन गाडेकर व त्यांची पत्नी माधुरी गाडेकर यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून सुमारे 1 लाख 46 हजारांची रक्कम काढल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर आला होता. त्यामध्ये मोहन गाडेकर यांचे अकाऊंट मधून दि. 28 डिसेंबर 18 रोजी 80 हजार व दि. 29 डिसेंबर 18 रोजी 40 हजार असे मिळून 1 लाख 20 हजार तर त्यांच्या पत्नी माधुरी गाडेकर  दि.28 डिसेंबर 18 रोजी एकुण 26 हजार असे पती पत्नी मिळून दोघांचे खात्यातून एकुण 1 लाख 46 रूपयांची रक्कम चोरली आहे. आपल्या एटीएम कार्डव्दारे कोणी पैसे एटीएममधून पैसे कुटुंबातील कोणी काढले की काय ? याची चौकशी केली असता त्यांना समजले की पती-पत्नी पैकी कोणीही एटीएमचा वापर करून पैसे काढलेले नाहीत. आपल्या बँक खात्यातून 1 लाख 46 हजार रुपयांची रक्कम कोणी ? काढली कशी काय खात्यातून रक्कम काढली गेली कशी ? असा प्रश्‍न निर्माण झाला म्हणून त्यांनी बँकेकडून जाऊन आम्ही रक्कम काढली नाही मग आमचे खात्यावरील रक्कम गेली कुठे याची चौकशी केली असता त्यांना समजले की एटीएम कार्डचे क्लोन बनवून गैरवापर करून रक्कम लांबविली असण्याची शक्यता वर्तविली गेली त्यांनंतर गाडेकर यांनी दोघांचेही एटीएम कार्ड बँकेतून ब्लॉक केले वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील मोठी रक्कम वाचली. 
       गाडेकर यांनी झालेल्या घटनेबाबत अहमदनगर येथील सायबर सेल अहमदनगर शाखेकडे या संदर्भातील गुन्हा नोंदविला आहे. एटीएम कार्डचे क्लोन बनवून एवढी मोठी रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याने ग्राहकांमध्ये व एटीएम धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे लांबविण्याच्या घटना एटीएम केंद्रात घडल्या होत्या. मात्र आता डायरेक्ट एटीएम कार्डचे क्लोन बनवून एवढी मोठी रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याने बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडेकर पती पत्नींनी अहमदनगर येथे यासंदर्भातील तक्रार केली असून पुढील तपास सायबर सेल विभागाचे पोलिस अधिकारी व पथक करत आहे.