Breaking News

गीतरामायणातून मानवी जीवनाचे सारे भाव अभिव्यक्त : मुख्यमंत्री

वाराणसी : गीतरामायणाच्या माध्यमातून मानवी जीवनातले सर्व प्रकारचे भाव अभिव्यक्त होतात. अशा या श्रेष्ठ निर्मितीचे आयोजन उत्तर प्रदेशात होत असल्याचा आनंद असून त्यातून दोन्ही राज्यांचे बंध अधिक घट्ट होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाराणसी येथे केले.

कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर व गगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाराणसी येथे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारतर्फे करण्यात आले होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री डॉ. नीलकंठ तिवारी, गदिमांचे सुपूत्र आनंद माडगूळकर, बाबूजींचे सुपूत्र तथा गायक श्रीधर फडके आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील मराठी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजर होते.
गीत रामायण हे मागील पाच दशकांपासून अधिक काळ मराठी मनावर राज्य करत असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, कोणतेही मराठी कुटुंब असे नसावे, ज्यांनी गीत रामायणाची अनुभूती घेतली नसेल. रामायणाची सर्व रचना प्राचीन काळाशी संबंधित आहे. मात्र, आधुनिक भारतात त्यावर सर्वांत सुंदर रचना ग. दि. माडगूळकर यांनी केली. तर त्यास सुधीर फडके यांनी सुंदर संगीत साज चढवला. प्रभू श्रीराम आमच्यासाठी एक आदर्श आहेत. उत्तम पुत्र, उत्तम पती, उत्तम पिता, उत्तम सखा, उत्तम योद्धा म्हणून ते जगले. त्यांच्या जीवनातील अभिव्यक्ती गीत रामायणातून मांडताना केलेली प्रत्येक रचना संवेदना जागवणारी आहे. मनुष्याच्या जीवनातले सगळे राग, भाव त्यात अभिव्यक्त होतात. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे उत्कट सत्य याच गीत रामायणाने मांडले. गीत रामायणातील अशा असंख्य रचनांना बाबूजींनी आपल्यासमोर तितक्याच ताकदीने जिवंत करण्याचं काम केलं, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी माणसाने जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन नाव कमावले आहे. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतही मराठी नाव माणसाचे नाव दुमदुमते आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गीत रामायण हा कार्यक्रम वाराणसीपाठोपाठ आग्रा, मेरठ आणि लखनऊ येथेही याच महिन्यात सादर होणार आहे. 

‘दोन राज्यांतील नाते मजबूत होईल’

वाराणसी भेटीचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, मी पाच वर्षानंतर काशीमध्ये आलो आहे. काशीतील विकासामध्ये झालेला बदल लक्षणीय आहे. येथे कधीकाळी असलेला भाव, पवित्रता, दिव्यता पुन्हा जाणवू लागली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या मतदारसंघात त्यांची स्वप्ने व संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने उत्तरप्रदेश सरकारने चांगली काम केली आहेत. काशीमध्ये एकदा यावे, ही प्रत्येकाची इच्छा असायची. हा भाव आता पुन्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात जागेल, इतका चांगला विकास येथे होतो आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आम्ही उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करतो. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील नाते गीत रामायणासारख्या कार्यक्रमांनी आणखी मजबूत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. गीतरामायणातून मानवी जीवनाचे सारे भाव अभिव्यक्त : मुख्यमंत्री

वाराणसी : गीतरामायणाच्या माध्यमातून मानवी जीवनातले सर्व प्रकारचे भाव अभिव्यक्त होतात. अशा या श्रेष्ठ निर्मितीचे आयोजन उत्तर प्रदेशात होत असल्याचा आनंद असून त्यातून दोन्ही राज्यांचे बंध अधिक घट्ट होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाराणसी येथे केले.

कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर व गगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाराणसी येथे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारतर्फे करण्यात आले होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री डॉ. नीलकंठ तिवारी, गदिमांचे सुपूत्र आनंद माडगूळकर, बाबूजींचे सुपूत्र तथा गायक श्रीधर फडके आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील मराठी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजर होते.
गीत रामायण हे मागील पाच दशकांपासून अधिक काळ मराठी मनावर राज्य करत असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, कोणतेही मराठी कुटुंब असे नसावे, ज्यांनी गीत रामायणाची अनुभूती घेतली नसेल. रामायणाची सर्व रचना प्राचीन काळाशी संबंधित आहे. मात्र, आधुनिक भारतात त्यावर सर्वांत सुंदर रचना ग. दि. माडगूळकर यांनी केली. तर त्यास सुधीर फडके यांनी सुंदर संगीत साज चढवला. प्रभू श्रीराम आमच्यासाठी एक आदर्श आहेत. उत्तम पुत्र, उत्तम पती, उत्तम पिता, उत्तम सखा, उत्तम योद्धा म्हणून ते जगले. त्यांच्या जीवनातील अभिव्यक्ती गीत रामायणातून मांडताना केलेली प्रत्येक रचना संवेदना जागवणारी आहे. मनुष्याच्या जीवनातले सगळे राग, भाव त्यात अभिव्यक्त होतात. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे उत्कट सत्य याच गीत रामायणाने मांडले. गीत रामायणातील अशा असंख्य रचनांना बाबूजींनी आपल्यासमोर तितक्याच ताकदीने जिवंत करण्याचं काम केलं, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी माणसाने जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन नाव कमावले आहे. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतही मराठी नाव माणसाचे नाव दुमदुमते आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गीत रामायण हा कार्यक्रम वाराणसीपाठोपाठ आग्रा, मेरठ आणि लखनऊ येथेही याच महिन्यात सादर होणार आहे. 

‘दोन राज्यांतील नाते मजबूत होईल’

वाराणसी भेटीचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, मी पाच वर्षानंतर काशीमध्ये आलो आहे. काशीतील विकासामध्ये झालेला बदल लक्षणीय आहे. येथे कधीकाळी असलेला भाव, पवित्रता, दिव्यता पुन्हा जाणवू लागली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या मतदारसंघात त्यांची स्वप्ने व संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने उत्तरप्रदेश सरकारने चांगली काम केली आहेत. काशीमध्ये एकदा यावे, ही प्रत्येकाची इच्छा असायची. हा भाव आता पुन्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात जागेल, इतका चांगला विकास येथे होतो आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आम्ही उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करतो. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील नाते गीत रामायणासारख्या कार्यक्रमांनी आणखी मजबूत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.