Breaking News

राहुरीत भुरट्या चोरांचा सुळसुळाटराहुरी/प्रतिनिधी

राहुरी शहरातील जंगम गल्ली, लखाई बोळ या परिसरात भुरट्या चोरट्यांसह बांबू गॅगने चांगलाच उच्छाद मांडला आहे. पोलिस प्रशासनाने या भुरट्या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील मठ गल्ली, लखाई बोळ, जंगम गल्ली, या भागात रात्री भुरट्या चोरट्यांनी रात्री दहशत पसरविली असुन येथीलच विशाल शेजुळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतील कपाटातील उचक-पचक करत कपाटातील रोख रक्कम 5 हजार लंपास केले.

तर बाजुला असलेले संजय गोंधळी यांच्या घरात अडकवलेल्या पॅन्ट मधील रोख रक्कम चोरट्यांनी बांबुच्या सहय्याने लंपास केली तसेच उंडे यांच्या घराच्या खिडकीत चार्जिंगला लावलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी नेला. तसेच किशोर जाधव यांच्या घराचा दरवाजा चोरट्यांनी वाजवत दहशत निर्माण केली होती. आजु बाजूचे नागरीक जागे झाल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले सदर माहिती ही सकाळी वरील लोकांनी राहुरी पोलिसांत दिली असुन घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी दाखल होत माहिती घेत चौकशी सुरु केली, मात्र पोलिसांची झंझटमारी नको म्हणुन अनेक नागरिकांनी कानावर हात ठेवल्याचे दिसुन आले. दोन आठवडे भरापुर्वी तनपुरे गल्ली येथेही बंद घराचे कुलूप तोडुन आतील कपाटातील रोख रक्कम काहीसे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिस प्रशासनाने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.