Breaking News

मकरसक्रांतीच्या सनानिमित्त रंगबेरंगी सुगड्या बाजारपेठेत दाखल


सातारा (अक्षय वायदंडे यांजकडून) : सध्या मकरसक्रांती सणाच्या निमित्ताने बाजारात रंगबेरंगी सुडगी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बाजारापेठेतील सुगडी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, जीएसटीमुळे कच्च्या साहित्याचे दर वाढल्याने सध्या संक्रातीच्या किंमती वाढल्या आहेत
संक्राती बनवण्यासाठी कुंभार व्यावसायिकांना नदीमधील गाळाची सुपीक माती लागते. त्यासाठी सातार्‍यामधील व्यवसायिक कृष्णा नदीतील माती विकत आणून सुडगी बनवतात. मात्र बदलत्या काळानुसार आणि भट्टीसाठी जागा नसल्याने तसेच भट्टीमुळे होणारे हवा प्रदूषणामुळे व्यवसांयिकांनी भट्टी लावणे बंद केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सातार्‍यामधील कुंभारवाड्यातील आवा बंद झाला असून आता अनेक व्यवसायिक मातीपासून बनवलेल्या सुडगी अर्थात कच्चा माल कोल्हापूरवरुन माल मागवत आहेत. विकत आणलेल्या या कच्चा मालाला रंगरंगोटी करुन बाजारात विकण्यासाठी आणला जातोय. 

कच्चा माल विकत आणताना लागत असलेल्या जीएसटीमुळे यावर्षी व्यवसायिकांनी दुप्पट किंमतीत कच्चा माल विकत घ्यावा लागतोय. सध्या कुंभार व्यसायिक मातीच्या संक्राती या कोल्हापूरमधून मागवत असून सातार्‍यामध्ये फक्त प्लॉस्टिक ऑफ पॅरिसच्या संक्राती बनवत आहेत. अगदी कमी वेळेत आणि कमी जागेत या बनवता येत असल्यामुळे याकडे सध्या व्यवसायिकांचा कल जास्त दिसून येत आहे. या दोन्हीही प्रकारच्या संक्राती बाजारात असून ग्राहकाकडून यांला भरपूर मागणी आहे. संक्रांती मध्ये छोट्या मोठ्या आकारानुसार दर आहेत. छोट्या संक्रातीचे दर हे 20 ते 50 रुपये पर्यंत आहेत, तर मोठ्या संक्रातीचे दर हे 50 रुपये पासून पुढे 100 ते 150 रुपये पर्यंत आहेत. 

बदलत्या काळानुसार आणि वाढत्या महागाईनुसार मातीचे आणि रंगाचे वाढते दर, कच्च्या मालापासून तयार करण्यासाठी येणारा खर्च, आणि जीएसटीमुळे वाढलेले दर यामुळे व्यवसायीकांना हा व्यवसाय करणे परवडत नसल्याचेदेखील अनेक व्यावसायिकांचे मत आहे.

सुगड्यांसाठी सातार्‍यात भरपूर मागणी असली तरी सातार्‍यातील कुंभारवाडा परिसरात भट्टी लावण्यासाठी जागा नसल्याने आम्ही सध्या कोल्हापूर येथून कच्चा माल मागवून त्याला रंगरंगोटी करुन बाजारात विक्रीसाठी ठेवत आहोत.
- विशाल कुंभार, सातारा