Breaking News

दुष्काळास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या


पारनेर/ प्रतिनिधी सततचा दुष्काळ व नापिकीला कंटाळून नागबेंदवाडी भाळवणी येथील तरूण शेतकरी राजेंद्र दामू रोहोकले वय 35 यांनी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. 

भाळवणी परिसरात गेल्या काही वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असून कोणत्याही पिकांचे अपेक्षित उत्पन्न शेतकायांच्या पदरी न पडल्याने नैराश्यतेची भावना वाढीस लागल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. रोहोकले यांनी सोमवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची फिर्याद बाबू त्रिंबक रोहोकले यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दिली. पारनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नाना पटेल    पुढील तपास करीत आहेत.