Breaking News

पेट्रोल पंपावरील पाईपबाबत साशंकता


दहिवडी (प्रतिनिधी) : पेट्रोल पंपावर अपारदर्शक पाईपमधून गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल सोडले जाते. त्यामधून नेमके पेट्रोल किंवा डिझेल टाकीमध्ये किती पडते, याबद्दल ग्राहकांच्या मनात मोठी शंका असते. 
या अपारदर्शक पाईपचा गैरवापर करीत पंपमालक मनमानी करताना दिसतात व त्यातून ग्राहकांची मोठी फसवणूक होताना दिसते. 

त्यासाठी पेट्रोल पंपावर वापरल्या जाणार्‍या काळ्या रंगाच्या पाईप्स बदलून त्या पारदर्शक स्वरूपाच्या करण्यात याव्यात, अशी मागणीही ग्राहक प्रबोधन समितीने केली आहे. येत्या 15 दिवसांत याबाबत सुधारणा न झाल्यास ग्राहक प्रबोधन समिती तीव्र आंदोलन छेडेल, असे समितीचे अध्यक्ष राजू मुळीक यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन प्रबोधन समितीने दहिवडीच्या तहसिलदारांना दिले आहे.