सहा पोलिसांना घेऊन जाणारी एक बोट रात्री बुडाली; पोलिसांना वाचविण्यात यश

मुंबई/प्रतिनिधीः
सहा पोलिसांना घेऊन जाणारी एक बोट रात्री गिरगाव चौपाटीजवळ बुडाली; मात्र सतर्क जीवनरक्षकांनी तातडीने धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

चौपाटीपासून तीनशे मीटर आत बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तैनात असलेला जीवनरक्षक प्रतीक वाघे याने रेस्क्यू बोर्ड घेऊन तिथे धाव घेतली. या पोलिसांपैकी कुणीही जीवनरक्षक जॅकेट घातलेले नव्हते आणि ते बुडणार्‍या बोटीवर एकमेकांना धरून हादरलेल्या अवस्थेत उभे होते. त्यातील एकाला तर उलट्याही होत होत्या. हा प्रकार जीवनरक्षकाकडून समजल्याने गस्तीवरील बोटही तेवढ्यात तिथे दाखल झाली आणि या बोटीने सर्व सहा पोलिस किनार्‍यांवर सुरक्षितपणे आणण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget