Breaking News

राजमुद्रा संघटनेचे मादळमोही शाखेचे उद्घाटन संपन्नबीड, (प्रतिनिधी): राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष किशोर पिंगळे यांच्या शेकडो युवक, शेतकरी मायबाप, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत काल मादळमोही येथे शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राजमुद्रा एक सामाजिक संगटना असून त्याचबरोबर ही सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी शेतकर्‍यांची काम करणारी संस्था असून पुढे ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्पर राहते. तसेच आज संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रखर दुष्काळ पडला असून या दुष्काळाला घाबरून शेतकरी हवालदिल झाला असून आत्महत्यासारखे पर्याय म्हणून टोकाची भुुमिका घेवून शेतकरी आपले आयुष्य संपवून आपल्या कुटूंबाला पोरके करून सोडून जात आहे. तरी शेतकर्‍याने आत्महत्या करू नये.
 जरी शेतकर्‍यांचा मनात आले तर राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या कोणत्याही पदाधिकार्‍याला आवाज द्या तो तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल असे आवाहन राजमुद्राचे अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी मादळमोही शाखा उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात बोलले. शाखा उद्घाटन प्रसंगी काही युवकांना पदभारानी सोहळा सुध्दा छोट्याखानी अटपण्यात आले.