Breaking News

साखरेच्या घटत्या दरामुळे राज्यातून साखरेची निर्यात कमी


पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेच्या घटत्या दरामुळे राज्यातून होणारी साखरेची निर्यात कमी होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कारखान्यांकडून दिल्या जाणार्‍या पेमेंटवर होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील शेतकर्‍यांना अद्यापही उसाच्या वाजवी दराची सुमारे 60 टक्के रक्कम मिळालेली नाही. सुमारे 15 लाख टन अतिरिक्त साखरेच्या निर्यातीतून मिळणारी रक्कम त्यासाठी वापरली जाणार होती मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर 1900 रुपयांपर्यंत पडल्याने सध्याच्या परिस्थितीत निर्यातीचे नवे करार करण्यास कारखाने तयार नाहीत. तर देशांतर्गत साखरेचे भाव आणि निर्यातीचे दर यांच्यातील फरकामुळं कारखान्याचे होणारे नुकसान केंद्र सरकारने भरून द्यावे अशी मागणी भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केली आहे .