समाजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील-घुले


शेवगाव/प्रतिनिधी  समाजातील वंचित घटकासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत स्व.मारुतराव घुले यांच्या समाजकारणाचा वारसा आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन जि.प.उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी केले आखतवाडे ता. शेवगाव येथे भैरवनाथ महिला बचत गटाच्यावतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभामध्ये जिल्हा परीषद उपाध्यक्षा राजश्री घुले अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, महीलांवर संपूर्ण कुटुंबाचा भार पेलावण्याची मोठी जबाबदारी असल्याने त्यांनी स्वतः शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम असले पाहिजे.


संस्कृतीच्या जतनामध्ये महीलांचे योगदान मोठे आहे. एकमेकांची सुखदुःखे वाटून घेणारा संक्रांत सण संस्कृती आणि सौभाग्य यांचा सुरेख संगम आहे. हळदीकुंकू समारंभ, बचत गट हे महिलांच्या प्रगतीसाठी व सन्मानासाठी गरजेचे आहे. कर्तृत्ववान पुरुषांच्या मागे आपण नेहमीच असतो पण आपल्यातील कर्तृत्ववान महीलांच्या पाठीमागेही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. यावेळी संजय कोळगे, अशोक भवारी, रामभाऊ साळवे, रागिनी लांडे, संगिता देशमुख, डॉ, सुधार लांडे, राजेंद्र देशमुख, रोहन साबळे, रघुवीर उगले, अ‍ॅड. बाबासाहेब उगले, रमेश गोरे, रहीम शेख, सुधाकर उगले, दिगंबर उगले, भगवान होडशीळ, वचिष्ठ उगले, सोमनाथ उगले, कविता गोटे, प्रांजली साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती उगले, मंगल उगले, वैशाली उगले, सुरेखा बनकर, अनिता उगले, वनिता उगले आदींनी प्रयत्न केले. यावेळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. त्यांना व तालुक्यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्याार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सुनिल खैरे यांनी केले. तर रमेश लोखंडे यांनी आभार मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget