शूरवीर जिवाजी महाले जयंती शासनस्तरावर साजरी व्हावीसातारा,  (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्याचे सुपूत्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्‍वासू अंगरक्षक नररत्न शूरवीर जिवाजी महाले यांची 9 ऑक्टोंबर ही जयंती नववर्षापासून शासन दरबारी साजरी करण्यात यावी. तसेच त्यांचे शौर्य आणि त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेवून तातडीने धोरणात्मक निर्णय घेवून कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नुकतेच सातारा दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ व सहकार्‍यांनी निवेदन दिले. याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या निवेदनाबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यावेळी नाभिक महामंडाळाचे जेष्ठ नेते भाऊ दळवी, चंद्रकांत जगताप, सुरेश पवार, महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर काशिद, जिल्हा सचिव अजीत काशिद, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन यादव, सातारा तालुकाध्यक्ष पांडूरंग राऊत, कार्याध्यक्ष बंटीराजे काशिद, जिल्हा कार्यकारी सदस्य बाबुराव रणदिवे, श्रीकांत पवार, तेजस राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात नाभिक महामंडळाने म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्‍वासू अंगरक्षक व सातारा जिल्ह्यातील कोंढवली (ता. वाई) येथील भूमिपूत्र जिवाजी महाले यांनी प्रतापगडाच्या पायथ्याला केलेल्या शोर्याची नोंद इतिहासात शिवप्रताप दिन म्हणून संपूर्ण जगाला ज्ञात आहे. स्वराज्य रक्षणासाठी दिलेले त्यांचे योगदान व शौर्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यामुळे या पराक्रमी स्वराज्य रक्षक जिवाजी महालेंची 9 ऑक्टोंबरला होणारी जयंती शासन दरबारी घेण्याचा ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा. अशी आमची आग्रहाची मागणी आहे.
शूर वीर जिवाजी महालेंचे स्वराज्यासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे. जिवाजी महाले यांची जयंती सर्व नाभिक बांधव साजरी करतात. मात्र, हा कार्यक्रम केवळ एका समाजापुरता मर्यादीत न राहता शासन दरबारी जयंती साजरी व्हावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणातही अनेक वेळा जिवाजी महालेंबद्दल गौरवोद्गार काढतात. त्यामुळे संघटनेची ही मागणी पूर्ण होईल, याची नाभिक बांधवांना खात्री आहे. मात्र, याबाबत चालढकल झाल्या तीव्र जनआंदोलन करावे लागेल, असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांच्या सहया आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget