Breaking News

खामगाव अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दुसर्‍यांदा आशिष चौबिसा बिनविरोधखामगाव : अग्रगण्य सहकारी बँक दि खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅक या मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँकेच्या अध्यक्षपदी आशिष चौबिसा यांची पुन्हा बिन विरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अमरावती येथील नरेंद्र करेसिया यांची निवड झाली आहे. खामगाव अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

 यावेळी नवनिर्वाचित संचालकांची सभा निवडणूक निर्णय अधिकारी शंतनू जोशी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नवनिर्वाचित संचालक यांचे बँकेच्या वतीने स्वागत व सभेचे प्रास्ताविक संचालक अरुण दुधाट यांनी केले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

यावेळी अध्यक्षपदावर आशिष चौबिसा व उपाध्यक्ष पदावर नरेंद्र करेसिया यांची बिन विरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रमाणपत्र देवून स्वागत केले.

तसेच बँकेच्या वतीने प्रबंध संचालक अरुण दुधाट, उप सरव्यवस्थापक पांडुरंग खिरोडकर, आदिनाथ किनगे व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले. त्यानंतर अध्यक्ष आशिष चौबिसा यांनी अतिशय पारदर्शकपणे निवडणूक पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी, नवनिर्वाचित संचालक, जे. व्ही. मेहता हायस्कूल प्रशासन, पोलिस प्रशासन, पत्रकार बांधव तसेच बँकेचे सर्व सन्माननीय सभासद बांधव यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन मुख्य शाखा शाखाधिकारी अजय माटे यांनी केले.