Breaking News

शिवसेना-भाजपच्या भांडणातही वेगळी रणनीती - जानकर


मुंबई/ प्रतिनिधीः 
’तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखो करतो, अशी शिवसेना आणि भाजपची सध्याची रणनीती आहे,’ असा दावा पशुसंवर्धन आणि दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. हे दोनीही पक्ष आगामी निवडणुकीत युती करणार आहेत, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला आहे. 

आता कितीही भांडत असले, तरी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे; पण नाहीच झाली, तर त्या दोघांमध्ये युती होण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल,’ असेही जानकर म्हणाले. येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र लढणार आहे, तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीसोबतच राहणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.