शेवगाव येथे दोन गटांत मारहाण ; बंदुकीने हवेत गोळीबार


शेवगाव/प्रतिनिधी
शहरातील शेवगाव रोडवरील हॉटेल श्रद्धामध्ये थर्टी फस्टच्या रात्री 11.45 ते 12.15 वाजण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वाद होऊन बंदुकीसारख्या शस्त्राने हवेत गोळीबार करण्यात आला. असल्याचा बबलू कांबळे यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या गुन्ह्यातील एका आरोपींना पोलिसांनी दुपारपयर्ंंत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मारहाणीत दत्तात्रय उर्फ बबलू कांबळे यांच्या डोक्याला मार लागला असून पुढील उपचारासाठी त्याला अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, बबलू कांबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, थर्टी फस्टच्या रात्री हॉटेल श्रद्धामध्ये मी जेवण करत होतो. त्यावेळी संतोष गायकवाड, सोनू मणियार, सोहेल मणियार, पांडू भांडकर, चिकू खेडकर, आशिष दानापुरे हॉटेलमध्ये आले असता त्यांना जेवायला या असे म्हटले. त्यावरून तू खूप जेवणारा झाला असे म्हणत वरील लोकांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील बंदुकी सारख्या शस्त्राने हवेत गोळीबार केला असल्याची फिर्याद दिली असून वरील सहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे, हवालदार अरविंद चव्हाण, संजय आव्हाड, रांजणे यांनी अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन फिर्यादीचा जवाब नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget