Breaking News

बुलडाणा जिल्हयात स्वाभिमानीचे आंदोलन चिघळले; शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तिव्र करणार : रविकांत तुपकर


बुलडाणा,(प्रतिनिधी): दुष्काळग्रस्त बुलडाणा जिल्हयातील शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये देण्यात यावे दुष्काळाच्या उपाय योजनांची तातडीने अंमल बजावणी करण्यात यावी तसेच शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे व अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांचे अनुदान तातडीने मिळावे या मागण्यांसाठी शेगाव तहसिल कार्यालयासमोर मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या स्वाभिमानीच्या उपोषणाची त्वरीत दख्ल घेण्यात यावी या मागण्यासांठी आज 1 जानेवारी रोजी जिल्हाभरात ठिकठिकाणी स्वाभिमानीच्या वतीने रस्तारोको करण्यात आला तर संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तीन एसटी बसेसची तोडफोड केली.

त्यामुळे स्वाभिमानीचे हे आंदोलन अधिक चिघळणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला आहे. बुलडाणा जिल्हा शासनाने दुष्काळग्रस्त् घोषीत केला खरा, पण अद्याप दुष्काळाच्या कोणत्याही उपाययोजना शासनाने लागू केल्या नाहीत, त्यामुळे दुष्काळाच्या योजना तातडीने लागू करून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत शासनाने त्वरीत दयावी या मागणीसाठी तसेच मागील वर्षी शासनाकडून नाफेडव्दारे तुर खरेदी करण्यात आली. या तुरीचे चुकारे अदयाप काही शेतकर्‍यांना मिळाले नाही, तसेच ऑनलाईनच्या गोंधळामुळे ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शेतकर्‍यांचे तुरीचे अनुदान मिळाले नाही.हे अनुदान शेतकर्‍यांना त्वरीत मिळावे या मागणीसाठी शेगाव तहसिल कार्यालयासमोर स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह 15 शेतकर्‍यांनी कडाख्याच्या थंडीत 26 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची आज सातव्या दिवशीही प्रशासनाकडून दखल न घेतल्याने आज 1 जानेवारी रोजी स्वाभिमानीच्या संतप् कार्यकर्त्यांनी बुलडाणा, भेंडवळ फाटा,चांगेफळ फाटा येथे एसटी बसेसची तोडफोड केली. व ठिकठिकाणी रस्तारोको करण्यात आले. बुलडाणा : बुलडाणा- खामगाव रोडवर सावळा फाटा येथे राणा चंदन यांच्या नेतृत्वात रस्ता रोको करण्यात आला. यावेळी शे. रफिक शे. करीम, ज्ञानेश्‍व्र कल्याणकर, पुरूषोत्त्म पालकर, दत्ता जेऊघाले, हरीभाऊ उबरहंडे, समाधान धंदर, शे. साजीद, केशव जेऊघाले, बादशाह खान, लतीफ चौधरी, समाधान नागवे,शैलेश चव्हाण, अमीन खासाब, सुरेश आघाव, बबन कानडजे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. चिखली : चिखली खामगाव रस्त्यावर दिवठाणा फाटा येथे भगवानराव मोरे, भारत वाघमारे, संतोष परिहार यांच्या नेतृत्वात रस्तारोको करण्यात आला.

यावेळी स्वाभिमानीचे संतोष शेळके, रामेश्‍व्र परिहार, छोटू झगरे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठया संख्येनी उपस्थित होते. देऊळगाव मही: देउळगाव मही येथे चिखली जालना मार्गावरील डिग्रस चौकात बबनराव चेके, संतोष शिंगणे, मधूकर शिंगणे, शे. जुल्फेगार, पुंडलीक शिंगणे, गणेश शिंगणे यांच्या नेतृत्वात रस्तारोको करण्यात आला. यावेळी भगावन मुंढे, अंबादास बुरकुल, समाधान देवखाने, विनोद नागरे, समाधान शिंगणे, स्वप्नील मुंढे, गजानन रायते यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान या रस्तारोकोमुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संग्रामपूर: संग्रामपूर येथे बसस्थानका समोर तालुका अध्यक्ष उज्व्ल चोपडे व मोहन पाटील यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी योगेश मुरूख, विलास तराळे, सुनिल अस्वार, प्रविण येरणकर, शिवा पवार यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून आठ कार्यकर्त्यांवरती भादवि कलम 341,143,135 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. शेगाव: शेगाव येथे कनारखेड फाटयावर रस्तारोको दरम्यान विठठल वखारे, योगेश वखारे, आषीश नांदोकार,रमेश ढगे, दत्तात्रय ढगे, श्रीकृष्ण सहस्त्रबुध्दे यांच्यावर पोलिसांनी भादवी कलम 341,135 नुसार गुन्हे दाखल केले. मोताळा: मोताळा येथे तहसिल कार्यालया समोर सै.वशिम, महेंद्र जाधव, प्रदिप शेळके यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली व तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळी चंदू गवळी, विजय बोराडे, सै. ताज, राजू पन्हाळकर, निलेश पुरभे, दत्ता शिबंरे, राजू शिंदे,गजानन गवळी, जाबीर खान, जुबेर पटेल, बाबुराव महाराज यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मेहकर: मेहकर येथे उपविभागीय कार्यालयासमोर स्वाभिमानीचे डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी सुभाष पवार, अमोल वाघमारे, प्रल्हाद खोडके, अनिल बोरकर, नितीन अग्रवाल, राजू पळसकर, अनिल ठोकळ, मिनेश बाजड, गणेश मोरे, गजानन मेटांगळे, दत्तात्रय मेटांगळे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठया संख्येनी उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने आंदोलनाची तात्काळ दखल घेवून शेतकर्‍यांना तातडीने मदत दयावी व शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तिव्र पध्दतीने करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशाध्ययक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.