Breaking News

डोईफोडवाडी शाळेत बालआनंद मेळावा उत्साहात सपन्न


गेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील ङोईफोवाङी जि.प.प्रा.शाळा केंद्र.रोहीथळ येथे बालआनंद मेळावा उत्साहात करण्यात आले. उदघाटन ह.भ.प.मधुकर महाराज डोईफोडे ,सरपंच महादेव वाघमोडे ,शा.व्य.समितीचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, केंद्रप्रमूख विष्णू आडे यांनी केले. शाळांनी नवनवीन उपक्रम वारंवार राबवावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहाराचीही जाणीव होईल आणि मनोरंजनही होईल. अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. बालआनंद मेळाव्याचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. त्यानंतर खरी कमाई अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्टॉल्स लाऊन बाजार भरवला. स्टॉल्समध्ये फळे, शैक्षणिक साहित्य तसेच खाद्यपदार्थामध्ये भेळ, वडापाव, भजी, गुलाब जामूण इ.समावेश होता.या बाजारामध्ये ४१००रू विक्री झाली. गावकय्रांनीही बाजाराला प्रतिसाद दिला.तसेच दुपारच्या सत्रात मनोरंजक खेळात बकेटमधील पाण्यातील वाटीत नाणे टाकणे, चेंडूने ग्लासला अचूक मारणे, गाढवाला शेपूट लावणे, उडी मारून जिलेबी खाणे व लंगडी इत्यादी खेळ घेण्यात आले. बालआनंद मेळावा मुख्यध्यापका विलास दुधाळ, आबासाहेब राठोड, यशस्वीतेसाठी शा.व्य.समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच यावेळी उपसरपंच भरत तवरे, विलास मोरे, अशोक चोरमले, भारती राजेंद्र, ज्ञानाेबा राठोड, नंदकूमार पवार, प्रशांत मस्के, कालिदास देशमाने शत्रुघ्न येडे, बाळासाहेब चौधरी, कैलास शेजाळ, चव्हाण उपस्थित होते