गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी लोकसहभागातून चळवळ-परजणे


कोपरगाव श/प्रतिनिधी
गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापितांनीच आपल्या सत्तेचा वापर करून अत्तापर्यंत कामे करणे गरजेचे होते. गेल्या कित्येक वर्षापासून कालव्यांची कामे प्रलंबित आहेत. कामे करता येत नसतील तर प्रस्थापितांनी कसे जाहीर सांगावे.आम्ही तालुक्यातील शेतकर्‍यांना बरोबर घेऊन लोकसहभागातून कामे मार्गी लागण्यासाठी चळवळ उभी करू असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी दिले. 

नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याचे आयुष्यमान शंभर वर्षाहून अधिक झालेले आहे. कालवे अरुंद झाले आहेत.कालव्यात झाडे झुडपे वाढलेली असल्याने पाण्याची वहन क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. कित्येक ठिकाणी फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यावर असलेल्या पोट चार्‍यांची तर अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. वर्तनाच्या कालावधीत लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जाते. त्यामुळे अगोदरच शेतकर्‍यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी नाबार्ड मार्फत निधी उपलब्ध करून देण्याचा त्यावेळी प्रयत्न देखील केला होता. परंतु राजकीय वर्तुळातून त्यांच्या प्रयत्नांची चेष्टा केली गेली. त्या वेळीच कामे झाली असती तर आज ही वेळ आली नसती. कालव्यांची दुरुस्ती करण्या बाबत अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारे विभागाकडे मागणी करत आहेत. थोड्याफार प्रमाणात डागडुजी करण्याचे काम पाटबंधारे विभागांकडून केले गेले. ठोस आणि शाश्‍वत कामे झालेली नसल्यानेत्याची दिवसेंदिवस वाताहत होत गेली आहे. कालव्यांच्या दुरुस्तीबाबत तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करीत असताना प्रस्थापित मंडळी कुठे गेली होती. त्यावेळी त्यांना कालव्याची आठवण का झाली नाही आणि आत्ताच बरी उपरती झाली. आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कदाचित हा मुद्दा जनतेसमोर मांडण्याचा खटाटोप की प्रस्थापित मंडळी करत तर नाही ना अशी चर्चा शेतकरी वर्गात चर्चिली जात आहे.
 
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने गोदावरी काल्याचे नूतनीकरण लोकसहभागातून करण्याचा निर्णय राहता तालुक्यातील लाभधारकांनी नुकताच घेतला. गेल्या चाळीस वर्षापासून प्रस्थापितांना काही आठवले नाही आणि आत्ताच कालव्यांच्या दुरुस्तीसाठी प्रसारमाध्यमांमधून आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला.प्रस्थापितांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावी आणि जर कामे होतच नसतील तर जनतेसमोर निक्षून सांगावे म्हणजे आम्ही कालव्याच्या दुरुस्तीसाठी लोकसहभागातून शेतकर्‍यांची चळवळ करू असेही राजेश परजणे यांनी सांगितले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget