Breaking News

कराडला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


कराड (प्रतिनिधी) : एफआरपीप्रमाणे साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना पहिला हप्ता एकरकमी द्यावा, या मागणीसाठी कराडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत घोषणाबाजी केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, विकास पाटील, शिवाजी पाटील, कृष्णत क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी कराडमधील दत्त चौक परिसरात यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या गट कार्यालय, त्यानंतर दत्त चौकातील भट्टड कॉम्प्लेक्समधील जयवंत शुगर आणि कराडमधील मार्केट यार्ड परिसरात असणार्‍या रयत कारखान्याच्या गट कार्यालयाकडे स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी आपला मोर्चा वळवला. यावेळी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास कारखान्याचे चेअरमन व संचालक यांना रस्त्याने खुलेआम फिरू देणार नाही, असा इशारा देत प्रसंगी त्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात येईल, असा इशाराही सचिन नलावडे यांनी यावेळी दिला.