Breaking News

वारकरी संप्रदायाने समाज अंधश्रध्दामुक्त केला महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन


बीड : प्रतिनिधी
मागील सातशे वर्षात कीर्तनकारांनी अंगात आणले नाही की समाजात त्यांनी अंधश्रध्दा पसरवली नाही. जीवन जगताना खुप विशेष आहात असं समजून नका तर सहज वागा, मोठेपणाचा लवलेशही दाखवू नका. तु मुक्त हो, देवाकडे जावू नको. हा अतिशय मोलाचा संदेश ज्ञानेश्‍वर महाराजांनी दिला. खर्या अर्थाने समाज अंधश्रध्दामुक्त करण्याचे कार्य या वारकरी संप्रदायाने केला. आजची तरुणांची पिढी अंधश्रध्देपासून दूर आहे याचा आंनद वाटतो असे विचार श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी मांडले.