शिवसेनेला पटकावणारा जन्माला यायचाय; उद्धव ठाकरे यांचे अमित शाह यांना कडवे प्रत्युत्तर


मुंबई/ प्रतिनिधी:
लातूर येथे झालेल्या बैठकीत ‘सोबत आले तर ठीक नाही, तर पटक देंगे या’’ भाजपे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला पटकवणारा अजून जन्माला आला नाही आणि येणारही नाही, असा टोला उद्धव यांनी लगावला आहे. 

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनामध्ये उद्धव बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येतील, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत, फक्त घोषणा व्हायची बाकी आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते. आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये भाजपवर टीका करण्याचे टाळले होते. 


लातूरच्या शाह यांच्या वक्तव्यावर उद्धव यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. 
मुंबईच्या सभेत ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. युतीची चर्चा होणारी बैठकही लांबणीवर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला कोणी लेचेपेचे समजू नका. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. भरती आणि ओहोटीला आम्ही घाबरत नाही. लाटेची आम्ही वाट लावतो. काही जण काम न करता स्वत:ची टिमकी वाजवत बसतात.’’ विश्‍वास गमावला तर युद्ध जिंकणे अशक्य होते. सरकारने राम मंदिराचा मुद्दासुद्धा जुमलाच बनवला आहे. जो पक्ष देव, देश आणि धर्म यासाठी लढेल तो पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान पीक फसाल योजना!


ठाकरे यांनी या वेळी पीक विमा योजनेवरही टीका केली. “पंतप्रधान पीक फसाल योजना’’ अशा शब्दात त्यांनी या योजनेची खिल्ली उडवली. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, तर आठ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करा, अशी मागणी या वेळी उद्धव ठाकरे यांनी केली. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget