Breaking News

टोळेवाडीच्या माजी सरपंचावर खूनी हल्ला


पाटण  (प्रतिनिधी) : टोळेवाडी, (ता. पाटण) येथील माजी सरपंच नारायण गणपत डिगे (वय 62) यांच्यावर त्याच गावातीलच भीमराव देवकांत याने पाटणच्या लायब्ररी चौकात काल सायंकाळी धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केला. 

या हल्ल्यात नारायण डिगे यांच्या डोक्यावर व मानेवर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर भीमराव देवकांत यास पाटण पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.