नरवणेत बालसंस्कार केंद्राचा वर्धापनदिन साजरा


बिदाल (प्रतिनिधी) : युवक मित्र मंडळ बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2011 मध्ये नरवणे (ता. माण) येथे स्थापन झालेल्या नरवणे बाल संस्कार उपासना केंद्राचा वर्धापनदिन साजरा झाला. कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. रविवारी सकाळी 9 वाजता ग्रामस्वच्छता अभियान राबऊन स्वच्छता करण्यात आली. 

सरपंच दादासाहेब काटकर यांच्या हस्ते गावातील परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लक्ष्मण नगरे, सुनील पाटील, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले. त्यानंतर विद्यार्थीनी आरती महामुनी, अंजली पिसाळ यांनी मनोगत केले. प्रमुख वक्ते सुनील पाटील यांनी संस्कार केंद्राचे कौतुक केले. यावेळी सरपंच दादासो काटकर पोलीस पाटील विजयसिंह काटकर, अरुण काटकर, ग्रामस्थ, भजनी मंडळ, तसेच शिबिरातील बॅन्जो विद्यार्थी, व्यसनमुक्ती संघाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget