Breaking News

चाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार


जामखेड ता./प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस वर्षीय इसमाने चाकूने मारहाण करून बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणीवरील आरोपी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चुंभळी येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत आसलेली अकरा वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या आई वडीलांसमवेत राहते. दि. 12 रोजी पिडीत मुलीचे वडील जामखेडला व आई ही विटभट्टीवर कामाला गेले, असता सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर वय 40 वर्षे.रा.चुंबळी. ता जामखेड आरोपीने या अल्पवयीन मुलीला आपल्या घरामध्ये बोलवले व घराचा दरवाजा आतुन बंद करुन मारहाण करुन बलात्कार केला. सदर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर दुसर्‍या दिवशी दि. 13 रोजी रात्री आठ वाजता पुन्हा या मुलीस घरी बोलावून चाकूने मारहाण करून घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारुन टाकेल, अशी धमकी दिली. यानंतर पिडीत मुलीने सदरची घटना झालेली आपल्या आईवडिलांना सांगितली. यानंतर पिडीत मुलीच्या आई वडीलांनी जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेतली. या अगोदर देखील आरोपीने अनेक वेळा या मुलीची छेडछाड करुन त्रास दिला होता. अशी माहिती पिडीत मुलीच्या आईवडिलांनकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सध्या आरोपी हा फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सा.पो.नि. निलेश कांबळे हे करत आहेत.