Breaking News

ई-लर्निंग शाळेत आनंद मेळावा

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधी  शेवगाव नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील जिल्हा परिषद ई-लर्निंग शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळवण्यासाठी होण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमातून आपली वेगळी ओळख निर्माण हावी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील यावेळी शाळेतील 60  विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्यात भाजीपाला फळे विक्रीसाठी आणले होते. पालकांसह विद्यार्थ्यांनी या आनंद मेळावाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी प्रवीण विठ्ठल आढाव, श्रद्धा भापकर यांच्याकडील फळभाज्यांची उच्चांकी विक्री झाली. या आनंद मेळाव्यामध्ये देवटाकळी केंद्राचे केंद्रप्रमुख शेटे, हरिभाऊ दुकळे, जयवंत दुकळे, अशोक देशपांडे, रमेश    आढाव, अनिल दुकळे, मुक्ताजी आढाव, किसन लांडे, ज्ञानेश्‍वर शिंदे, ज्ञानदेव सौदागर, अनिता नेव्हल, संगीता जाधव, उषा सौदागर, कविता लोखंडे, मनीषा लोखंडे, कांताबाई चव्हाण यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ गवळी, सुवर्णा कदम रोहिणी साबळे आदी उपस्थित होते.