Breaking News

बाभुुळगाव रस्त्याच्या डांबरीकरणासाठी साडेतीन कोटी मंजूर


कर्जत/प्रतिनिधी - पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री आहेत. करपडी फाटा ते बाभुळगाव हा डांबरीकरण रस्ता होण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून मागणी होती. या मागणीसाठी    15 वेळा आंदोलन केले. तरी देखील राष्ट्रवादी सरकारने त्याची दखल घेतली नाही. आताच्या शिवसेना भाजपा सरकारने हा रस्ता तात्काळ मंजुर काम केले. मात्र काम खराब झाल्यामुळे आम्ही या प्रश्‍नावर उपोषण केले. 

त्यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट देऊन पुन्हा निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले. या कामासाठी त्यांनी तात्काळ  साडेतीन कोटी रुपये मंजुर करून घेतले. त्यांनी दिलेले वचन पाळल्याने त्यांची शिंपोरे येथे लाडु तुला करून घोड्यावर बसवुन मिरवणुक काढली असे स्पष्टीकरण शिंपोरे गावचे सरपंच बिभीषण गायकवाड यांनी दिले. राष्ट्रवादीचे रोहीत पवार यांनी नुकताच शिंपोरा येथे शेतकरी मेळावा घेवून पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर दुष्काळी परिस्थिती असताना लाडू तुला करून घेतल्याने टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर ते शिंपोरे येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पन्नास वर्षात जी कामे झाली नाही ती पालकमंत्री यांनी तीन वर्षात केली. आम्हाला राजकारण क   रायचे नाही तर समाजकारण करायचे आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांचा कार्यक्रम घेतला. यावेळी दिवशी गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. मेळाव्यात रोहीत पवार व राजेंद्र फाळके म्हणाले की, कार्यक्रमाचा एवढा खर्च कोणी केला समजलेच नाही. त्याला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, सरपंच या नात्याने हा सर्व खर्च मी स्वतः केलेला असून त्यात कोणीही मदत केलेली नाही. पालकमंत्री हे विकासाचा ध्यास घेतलेले मंत्री असून कर्जत-जामखेडचा यापुढील आमदार हा भाजप-शिवसेनेचाच असेल. तेही प्रा. राम  शिंदे हेच असतील. बाहेरचे पार्सल कर्जत-जामखेडची जनता स्विकारणार नाही. कारण राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचा केलेला विकास जनता कधीच विसरणार    नाही.