Breaking News

कराड तालुक्यात दोन अपघात; दहाजण जखमी


कराड (प्रतिनिधी) : वराडे व वहागाव गावच्या हद्दीत दोन वेगवेगळे अपघात झाले. या अपघात दोन चिमुकल्यांसह सुमारे दहाजण जखमी झाले असून जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शनिवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास उभ्या असणार्‍या कारवर पाठीमागून येणार्‍या आय ट्वेंटी कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये अमृत बबनराव उतरवा, ज्योती अमृत उतरवा, गिरीश अमोल उत्तरवा, मंगला बबनराव उतरवा, पूजा उतरवा (सर्वजण राहणार पुणे)े हे जखमी झाले आहेत. दरम्यान, शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या मारुती कारने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये प्रवीण रंगराव कुंभार, राज प्रवीण कुंभार, जयश्री कुंभार राहणार (रा. इंदोली, ता. कराड) हे जखमी झाले आहेत. तसेच मारुती कारमधील अकबर इम्राहीन नदाफ (वय 65), मुमताज अकबर नदाफ (वय 64, दोघे राहणार धांडोरी, पुणे)े हे जखमी झाले आहेत.