Breaking News

खेळाडुंनी चांगल्या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तराववर नावलौकिक मिळावा : दिलीपकुमार सानंदा


खामगाव,(प्रतिनिधी): क्रिकेटच्या खेळातुन खेळाडूंनी खेळाडुवृत्ती जोपासून जय पराजयाची पर्वा न करता आपल्या अंगातील कलागुणांचा विकास करून नाव लौकिक प्राप्त करावा. चांगल्या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तराववर नावलौकिक मिळवावे, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. खामगांव तालुक्यातील कंझारा येथे केजीएन स्पोर्टस् क्लबच्या वतीने केजीएन ट्रॉफी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांच्या बक्षीस वितरण सोहळा दि.31 डिसेंबर रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, विदर्भ कबडड्ी असो.चे अध्यक्ष अशोकबाप्पु देशमुख, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मो.वसीमोदद्ीन, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शफीउल्ला खाँ, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष बबलु पठान, युवक काँग्रेसचे तुषार चंदेल, हिदायत खान, किफायत भाई, इरफान शाह आदींची प्रमुख उपस्थिती होती. खामगाव तालुक्यातील कंझारा येथील केजीएन स्पोर्टस् क्लबच्या वतीने शहरी व ग्रामीण भागासाठी केजीएन ट्राफी क्रिकेट सामन्यांचे मागील 15 वर्षापासून सातत्याने आयोजन करण्यात येत असते. यंदा 20 नोव्हेंबर पासून केजीएन ट्रॉफीला कंझारा येथे प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये एकूण 40 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21 हजार रुपये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या कडुन तर द्वितीय बक्षीस 10 हजार रुपये काँग्रेस पदाधिकार्‍यांकडून होते. स्पर्धेचा अंतीम सामना अर्शद एलेवन खामगांव विरुध्द केजीएन क्रिकेट क्लब कंझारा या संघादरम्यान खेळला गेला. प्रारंभी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी खेळाडुंचा परिचय करुन घेतला. तद्नंतर आयोजकांच्या वतीने आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे सह मान्यवरांचे पुष्पहार देवुन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाउ उमाळकर यांच्या हस्ते नाणेफेक करुन अंतीम सामन्याला सुरुवात करण्यात आली. या सामन्यांमध्ये केजीएन संघ कंझाराने प्रथम फलंदाजी करुन 7 षटकांत 3 गडी गमावुन 50 धावा काढल्या. 51 धावांचे विजयी उदिद्ष्ट अर्शद एलेवन संघाने 6.2 षटकात 3 गडी गमावून पुर्ण केले. अर्शद एलेवनच्या वतीने मोहसीन कुरेशी यांनी सर्वाधीक 30 धावा काढल्या.   यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या अर्शद एलेवन संघ खामगांवला 21,000 रू. रोख प्रथम पारितोशिक वितरीत करण्यात आले. तर केजीएन क्रिकेट संघ कंझारा यांना 10,000 रू. द्वितीय क्रमांकाचे पारितोशिक देण्यात आले.तसेच या स्पर्धेत मॅन ऑॅफ द सिरीज, बेस्ट बॉलर,बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द मॅच यासारखे व्यक्तिगत पुरस्कार सुध्दा खेळाडुंना प्रदान करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता मो.शाकीर, मो.नफीस, मो.नाजीम, मो.मुदद्सर, नौशाद खान, अजिम खान, अफजल खान, मो.अजहर, अकबर खान, मो.इरशाद, मो.अरशद, तारीख खान, बशारत खान, मो.इरशाद, मो.आबीर, सादीक खान, जुनेद खान, मो.अजहर, अकबर खान, जुल्फकार खान, शादफ खान, अयाज खान, अजीम खान, अजमल खान, अफजल खान, मो.अजहर, अकबर खान आदींनी परिश्रम घेतले.