Breaking News

तनपुरे कारखान्याचे गळीत हंगामातील उसाचे पहीले पेमेंट वर्ग


राहुरी/प्रतिनिधी
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा 2028-19 च्या गळीत हंगामातील गळीत झालेल्या उसाचे पहीले पेमेंट रुपये 2100 प्रमाणे बँकेत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उदयसिंह सुभाष पाटील यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना चेअरमन उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, या हंगामातील उसाचेे पहिले पेमेंट रुपये 2100 प्रमाणे बँकेत वर्ग करण्यात आलेले आहे. हे अंतिम पेमेंट नसून इतर कारखान्यांच्या बरोबरीने याही कारखान्याच्या ऊसाला भाव दिला जाणार आहे. त्याचबरोबर या पेमेंट मध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही. सर्वांच्या सहकार्याने कारखाना अतिशय सुस्थितीमध्ये सुरू आहे. त्यामुळे कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम अतिशय चांगला पार पडेल असा आम्हाला विश्‍वास आहे.

ऊस उत्पादक सभासदांचे ही मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे सर्व कामगार अतिशय कष्टाने ही कामधेनू पुन्हा सुस्थितीत यावी म्हणून कारखाना प्रशासनाला मदत करीत आहेत. याचप्रमाणे उसाचे गाळप होत राहिले तर नक्कीच पाच लाख टनापर्यंतचे उद्दिष्ट आम्ही कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडू असा विश्‍वास वाटतो. सुजय विखे हे स्वतः सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. सर्वांचे सहकार्य लाभत असल्याने चांगले दिवस येतील असा विश्‍वासही यावेळी उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.