Breaking News

शेखरभाऊ प्रतिष्ठानची रूग्नवाहिका ठरतेय जीवनदायी
दहिवडी (प्रतिनिधी) : माणमधील शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या मोफत रूग्णवाहिकेमुळे माण आणि खटावमध्ये सर्वसामान्य जनतेला जीवनदायीनीच लाभल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, समाजकारण, राजकारणात कार्यरत असणार्‍या झुंजार नेतृत्त्व शेखरभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन 2012 पासुन 24 तास रूग्णवाहिका सेवा दिली जाते. अपघातप्रसंगी वेळ न घालवता तातडीने प्रतिष्ठानची अ‍ॅम्बुलन्स धावुन जाते. गंभीर रूग्णास आँक्सिजनची गरज असल्यास ती सुविधाही रूग्णवाहिकेत उपलब्ध केली जाते. याशिवाय एसी, वेंटीलेटर यांची गरज आसल्यास त्यांची सुविधाही रूग्णास दिली जाते. ही रूग्णवाहिका सेवा पूर्णपणे विनाशुल्क दिली जाते. तसेच अधिक उपचारांसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, हैदराबाद, सातारा, कराड आदी ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचे कामही केले जाते. केवळ माण -खटाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात कोणत्या पेशंटला अगदी बारामतीपर्यंत कोणाही गरजूच्या फोनवर ही अँबुल्नस धाव घेताना दिसत आहे. गेल्या वर्षभराच्या आपल्या नोकरीच्या कालावधीत दोनशेहून अधिक रूग्णांना जीवनदान देण्यास यश आले असून कोणताही पक्षपात न करता निस्वार्थीपणे पूर्णवेळ सेवा देण्याचे प्रतिष्ठानच्या सूचना आहेत. ही सेवा माझ्या हातुन घडते हे माझे भाग्य आहे, असे या रूग्णवाहिकेवरील कर्मचारी विवेक गायकवाड यांनी दैनिक लोकमंथनच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.