Breaking News

बुद्धांचे पाली लिपीतून मराठीत भाषांतरासाठी सामंजस्य करार


पुणे : भगवान बुद्धांचे तत्वज्ञान, उपदेश पाली लिपीतून मराठीत भाषांतर करण्याच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बार्टीमध्ये स्वाक्षर्‍या झाल्या. भगवान बुद्धांचा नष्ट झालेला साहित्यिक तसेच सांस्कृतिक वारसा भारतात पुन्हा एकदा प्रस्थापित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.बार्टीचे महासंचालक, कैलास कणसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगूरू, डॉ. नितीन करमळकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून या ऐतिहासिक कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

या प्रकल्पासाठी पाच कोटी रूपयांचा एकरकमी निधी सामाजिक न्याय विभागाकडून मंजूर करून घेण्यामध्ये आ.अ‍ॅड.गौतम चाबुकस्वार यांनी विशेष प्रयत्न केले होते. आ. चाबुकस्वार हे स्वत: पालीचे प्राध्यापक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागात ते अध्ययनाचे कार्य करतात.