मुख्यमंत्र्यांना ‘डाकू‘ म्हटल्याने मुख्याध्यापक निलंबीत


जबलपूर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करणे एका मुख्याध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. मुकेश तिवारी असे निलंबीत करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

जबलपूर येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत तिवारी हे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. “14 वर्षे भाजपचे सरकार होते. त्या वेळी आम्हाला त्रास सहन करावा लागत होता; परंतु आता तर काँग्रेसचे सरकार आले आहे. आता काय होते, ते पाहावे लागणर आहे. आमच्या समाजात अनेक अडचणी आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कसेही असले, तरी ते आमचेच होते; परंतु कमलनाथ यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या ते तर डाकू आहेत.’’ असे वक्तव्य तिवारी यांनी केले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी जबलपूरचे जिल्हाधिकारी छावी भारद्वाज यांची भेट घेतली. तिवारी यांना निलंबीत करण्याची मागणी केली. व्हिडिओची चौकशी केल्यानंतर तिवारी यांना निलंबीत करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget