Breaking News

सुनीलदत्त शिंदे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर


कराड (प्रतिनिधी) : ओंड (ता. कराड) येथील ओंड शिक्षण मंडळातर्फे माजी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार यंदा ओंड गावचे सुपुत्र आणि येवती, म्हसोली पाणी संघर्ष समिती व वाकुर्डे योजनेचे समन्वयक सुनीलदत्त श्रीरंगराव शिंदे यांना जाहीर झाला आहे. 

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी सन्मानपूर्वक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासो थोरात व सचिव प्रकाश शिंदे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते व ओंड शिक्षण मंडळचे संचालक सुरेश शामराव थोरात यांचे अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता विद्यालयाच्या श्रीसिद्धिविनायक सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. तरी या कार्यक्रमास ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापक व्ही. टी. थोरात यांनी केले आहे.