Breaking News

करवंड येथील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई;स्वाभिमानीने केले वन्यजीव विभागाच्या कार्यालयात आंदोलन


बुलडाणा,(प्रतिनिधी): मागील 20 ऑक्टोबर 2010 रोजी करवंड  येथील शेतकर्‍यांचे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरा संदर्भात पशुवैदयकिय अधिकार्‍यांच्या अहवाल येताच व राहीलेल्या त्रुटी पुर्ण करून दिल्या नंतर तातडीने नुकसान भरपाईची कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव यांनी  शिष्टमंडळाला दिले.  आजा 9 जानेवारी रोजी स्वाभिमानीचे विदयार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांच्या नेतृत्वात करवंड येथील शेतकर्‍यांना सोबत घेवून वन्य जीव कार्यालयात तब्ब्ल पाच तास ठिय्या मांडून संबंधीत अधिकार्‍यास धारेवर धरले होते.

मागील चार महिण्यापासून सदर शेतकर्‍यांच्या जनावरांचा प्रश्‍न कायम प्रलंबीत होता. अखेर स्वाभिमानीच्या प्रयत्नांना 35 शेतकर्‍यांना न्याय मिळाला. या बाबत माहीती अशी की, मागील 20 ऑक्टोंबर 2018 रोजी  करवंड येथील शेतकर्‍यांचे पाळीव जनावरे ज्ञानगंगा अभयारण्यात पकडले होते. ही जनावरे बोराळा चौफुल्लीकडे संध्याकाळी कोंडवाडयात टाकण्यासाठी नेत असताना बिबटयाच्या आवाजाने ही जानावरे जंगलाच्या दिशेनी पळून गेले होते. त्यामूळे या जनावरांना कोंडवाडयात टाकणे शक्य झाले नाही. या संदर्भात संबधीत वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव खामगाव यांनी जागेचा पंचनामा करून प्रथम गुन्हा  रीपोर्ट केल्यामुळे त्यांनी कायदेशीर कारवाई केली. सदर गुरे ही जंगलात पळून गेल्याने  ती आतापर्यंत गायब असल्याने ती जनावरे वन्यप्राण्यांनी मारून टाकल्याचा आरोप शेतकर्‍यांचा होता. या बाबत वारंवार वन्यजीव विभागाकडे अर्ज करून सुध्दा या शेतकर्‍यांना न्याय मिळत नव्हता अखेर आज स्वाभिमानीचे पवन देशमुख यांच्या नेतृत्वात  दत्ता जेउघाले, शे. मुक्तार भाई, अशोक पवार, संतोष जर्‍हाड, अनिल् जोशी यांनी शेतकर्‍यांना सोबत घेवून वन्यजीव विभागाचे कार्यालय गाठले व कार्यालयातच ठिय्या  मांडला. जोपर्यंत शेतकर्‍यांना त्यांच्या जनावरांची नुकसान भरपाई  मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हालणार नाही, अशी  भुमिका घेतल्यामुळे अधिकारी घाबरले होते. अखेर वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव यांनी वरीष्ठ् पातळीवर चर्चा करून तसेच सदर प्रकरणाचा अहवाल बघुन संबंधीत पशुवैदयकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर संबधीत शेतकर्‍यांना लेखी आश्‍वासन दिले. यामध्ये म्हटले आहे की, करवंड येथील ग्रामस्थांचे पाळीव जनावरे वन्यजीव वि भागाच्या हददीत मृत झाल्यामुळे त्यांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी चर्चा केली. तसेच राहीलेल्या त्रुटी पशुवैदयकीय अधिकारी यांचा केसवाईज पंचनामे रीपोर्ट आल्यानंतर पुढील नुकसान भरपाईची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्‍वासनात म्हटले आहे. यावेळी करवंड येथील ज्ञानेश्‍वर गायकवाड, ज्ञानेश्‍वर जाधव, श्रीराम गवई, समाधान कुकडे, ज्ञानेश्‍वर गरड, मोहन ठाकरे, कृष्णा राठोड, नारायण आडे, रवी राठोड जनावरांचे मालक उपस्थित होते.