Breaking News

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाकडून तीन खेळाडूंना विश्रांती


मेलबर्न : भारताविरुद्ध होणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने तीन दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना मालिकेतून विश्रांती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या मते 2019 या वर्षात ऑस्ट्रेलियाला विश्‍वचषक स्पर्धा आणि इंग्लंडसोबत अ‍ॅशेस मालिका खेळायची आहे. त्यामुळे या खेळाडूंना आराम मिळणे गरजेचे असल्याचे लँगर म्हणाले. गेल्या काही काळात ऑस्ट्रेलियन संघाचे प्रदर्शन खराब होत आहे. त्यामुळे विश्‍वचषक आणि अ‍ॅशेस मालिकेसाठी या तीनही खेळाडूंचे संघात असणे गरजेचे आहे. त्यामुळे येणार्‍या काळात या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ही सावधगिरी बाळगण्यात येत आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात फक्त 2 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. तर 11 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.