Breaking News

बुलडाणा जिल्ह्याचे ‘राजमाता जिजाऊ नगर’ नामकरण करा : आ.मेटे

राष्ट्रमाता जिजाऊंच्या साठी इमेज परिणाम


चिखली,(प्रतिनिधी) मातृतीर्थ जिजाऊच्या पावन स्मृतीने पुनीत झालेल्या बुलडाणा जिल्ह्याचे ‘राजमाता जिजाऊ नगर’ असे नामकरण करावे, अशी आग्रही मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी येथे केले. चिखली येथील अंबिका अर्बनच्या साागृहात 9 जानेवारीला निर्धार मेळावा पूर्वनियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

 या बैठकीला पत्रकार अजय बिल्लारी, जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, पंजाबराव देशमुख, सरचिटणीस नितेश थिगळे, तालुकाप्रमुख विजय पाटील, राजेश इंगळे, राजेश चव्हाण, गजानन मापारी, प्रमोद पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार मेटे म्हणाले की, मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला राजमाता जिजाऊ नगर असे नामािाधान देण्या संदर्ाात अर्थसंकल्पातील अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षात शेतकरी कर्जमुक्ती, मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारक, एमपीएससी विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढविणे, कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना आदी मागण्यांसाठी शिवसंग्रामने मोठा लढा उाारला आणि उशिरा का होईना या संघर्षाची सरकारला दखल घ्यावी लागली असून यश मिळाल्याचे आ. मेटे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान शिवसंग्रामचा लढा सुरूच राहणार असून शेतकरी शेतमजूर व असंघटित कामगार यांना महिन्याकाठी 3 हजार रुपये पेन्शन मिळावी, बेरोजगार तरुण तरुणींना बेरोजगार भत्ता म्हणून मासिक 5 हजार रुपये देण्यात यावे, अन्यथा त्यांना हक्काची नोकरी कामे द्यावे, शेतकर्‍यांचा पिक विमा शासनाने 100 टक्के भरावा, महाराष्ट्रामध्ये नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावा, अशा विविध मागण्यांबाबत निर्धार करण्यासाठी 27 जानेवारीला शिवसंग्रामच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद येथील बीड बायपासवरील जबिंदा लॉन्सवर दूपारी 2 वाजता निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर महामेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. या मेळाव्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी अजय बिलारी, संदीप गायकवाड, निलेश थिगळ यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गणेश धुंदळे यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले.