Breaking News

प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्र महाविद्यालयात राज्यस्तरीय परिसंवाद


प्रवरानगर/प्रतिनिधी
सध्याची पिढी खूप हुशार आणि वेगवान आहे. शिक्षकांनी काळानुरूप स्वत: बदल करून बदलत्या तंत्रज्ञानाबाबत जागरुक राहतानाच आता काळाच्या पुढे जाऊन डिजिटल आणि सांगणाकाच्या माध्यमातून विविध अ‍ॅप, यू-ट्यूब व्हिडिओ, वेबसाईट, पीडीएफ, क्यूआर कोड यांचा वापर करून जो शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवेल तोच आपले अस्तित्व टिकऊ शकेल असे प्रतिपादन राहता तालुका शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्‍वर वाघचौरे यांनी केले.

लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्र महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एम.एड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षणात तंत्रस्नेही शिक्षणाचा वापर या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ज्ञानेश्‍वर वाघचौरे बोलत होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उस्मानाबादचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.महेश कळलावे, मुंबई येथील एस.एन.डि.टी विद्यापीठाच्या पी.व्ही डी.टी कॉलेज ऑफ एज्युकेशनचे सहायक अधिव्याख्याता अमोल उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रा. अशोक कांबळे यांनी परिचय प्रा. खरात यांनी स्वागत आणि प्रा. विद्या वाजे यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माद्यामिक विद्यालयांमधील शिक्षक शिक्षिका आणि अध्यापक महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
ज्ञानेश्‍वर वाघचौरे या वेळी म्हणाले की, राज्यभरामध्ये अध्यापक महाविद्यालयांची शिटी चिंताजनक असताना प्रवरानगर या ठिकाणची अध्यापक महाविद्यालये समकालीन शिक्षण देणारे अध्यापक घडविण्यात अग्रेसर आहेत. राहता तालुक्यात शंभर टक्के शाळा या संगणक युक्त असून 68 शाळांनी आय.एस.वो मानांकन मिळविलेले आहे. तर 2010 पासून शिक्षक सर्वच कामकाज ऑनलाईन पध्दतीने करू लागले आहेत. मात्र असे असले तरी शिकण्याच्या प्रक्रियेत मेंदूचं महत्त्व लक्षात घेणं ही यापुढच्या काळातली अपरिहार्य गोष्ट आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे अध्ययनास साहाय्य करणारी ज्ञानशाखा ही समृध्द करताना आता अध्यापनाला अधिक महत्त्व न देता विद्यार्थ्यांचे अध्ययन कसे परिणामकारक करता येईल याविषयी शिक्षकांनी रंगरूक राहणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. दोन दिवस चालणार्‍या या चर्चासत्रासाठी प्रा.निशा खरात, प्रा. नयना औताडे, प्रा. सचिन भोसले, प्रा. बोठे आणि शिक्षक प्रयत्न करीत आहेत. शेवटी प्रा. डॉ. मांढरे यांनी आभार व्यक्त केले.