Breaking News

राहुरीत राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा उद्घाटनराहुरी/प्रतिनिधी
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष किंगमेकरच्या भुमिकेत असेल, सर्वच समाजातील लोकांना एकत्रित करुन मोट बांधण्याचा प्रयत्न असणार असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष शरदराव बाचकर यांनी केले.

 तालुक्यातील तमनर आखाडा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यकार्यकारीणी सदस्य नितीनदादा धायगुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महासचिव गंगाधर कोळेकर, संचालक रावसाहेब तमनर, संचालक कैलास केसकर आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बाचकर म्हणाले राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना अहमदनगर जिल्ह्यात 2003 साली झाली असून येणार्‍या 2019 च्या निवडणूकीत ना. महादेव जाणकर साहेबांच्या परवानगीने जिल्ह्यातील सर्वच सर्व जागा स्वबळावर लढविण्यासाठी रासप तयारीला लागला आहे. जिल्ह्यातील अनेक पक्षातील इच्छूक उमेदवार आमच्या संपर्कात असून रासपा पूर्णतयारीने आगामी 2019 ला उतरणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन धायगुडे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून समाजाची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न असून रासप राज्यात सध्या पाच नंबरचा पक्ष असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शाखा बांधणी करत युवा वर्गाला पक्षात सामावून घ्या. ना.जानकर  मंत्री झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या हिताच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. दूधाच्या भावाविषयी साहेबांच्या काळात जास्तीतजास्त दूध उत्पादकांना भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. 1996 साली यशवंत सेनेच्या माध्यमातून पहिला मोर्चा जानकर काशिराम उपस्थितीत धनगरांना आरक्षण मिळावे म्हणून काढला होता. आज देखील सत्तेत असताना धनगर समाजाचा खर्‍या अर्थाने आरक्षण देवू शकतील तर ना. जानकर हेच देवू शकतात. यातून अनेक समाजाविषयी असणारे प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न करु. याप्रसंगी  पोपट गुलदगड,  गणेश हाके, नाना जुंधारे, दिपक मंचरे, संतोष गलांडे आदींसह ग्रामस्थ, युवा, रासपा कार्यकर्ते बहुसंख्येत उपस्थित होते. शाखाध्यक्ष सचिन कोपनर यांनी स्वागत तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्‍वर तमनर यांनी केले.