Breaking News

लम्हाण बाबा यात्रोत्सव उत्साहात


बेलापूर/प्रतिनिधी
श्रीरामपूर परिसरातील उक्कलगाव येथील लम्हाण बाबा यात्रोत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे. सकाळीच विविधत पुजन करुन महाअभिषेक घालण्यात आला होता. यावेळी परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली होती. जागृत देवस्थान पैकी एक असलेले लम्हाण बाबा देवस्थान येथे दरसालाबादप्रमाणे याञा भरत असते. यात्रेसाठी गळनिंब ग्रामस्थ व उक्कलगाव ग्रामस्थ यात्रोत्सव भरण्यासाठी मदत करत असतात. यात्रोत्सवानिमित्त जि.प.चे अर्थ बांधकाम माजी सभापती बाबासाहेब दिघे लम्हाण बाबा देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. याप्रसंगी नामदेव मोरे यांच्या हस्ते दिघे पाटील यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी ग्रा.प चे सदस्य विकास रामदास थोरात, उत्तम थोरात, नवनाथ गडाख, प्रकाश थोरात, बाबासाहेब शिंदे, संजय चिधे, गणेश मोरे, हर्षद वाबळे, केशव थोरात , आदी सहमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.