Breaking News

रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्स पहिल्यांदाच आमने-सामने


पर्थ : येथे सुरू असलेल्या हॉपमॅन चषक स्पर्धेत टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमने-सामने येणार आहेत. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील. सध्याचा चॅम्पियन्स स्वीत्झर्लंडचा मिश्र दुहेरीचा संघ अमेरिकेविरुद्ध भिडणार आहे. दोन महान फलंदाज एकमेकांसमोर येणार असल्याने चाहत्यांमध्ये या सामन्याची मोठी उत्सुकता आहे.

या मुकाबल्यासाठी फेडररही उत्सुक असल्याचे दिसून आले. रविवारी या स्पर्धेतील सुरुवातीचा सामना फेडररने जिंकला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, आम्हा दोघांसाठी हा क्षण खूपच रोमांचकारी असेल. मला वाटते हा सामना अधिक टेनिस चाहते पाहतील. सेरेनाच्या कोर्टवर आणि कोर्टबाहेरील कामगिरीने मला नेहमीच प्रभावित केले आहे. आम्ही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहोत. त्यामुळे हा सामना चांगला होईल. फेडरर पुढे म्हणाला की, असा सामना पहिल्यांदाच होते आहे. यापुढे असे कधी होईल याची शक्यता खूपच कमी वाटते. सेरेना आमच्यासाठी मोठी प्रतिस्पर्धी आहे, तिच्याविरूद्ध खेळणे आव्हानात्मक आहे.