अमित शाह यांची रावते यांनी उडविली कराडमध्ये खिल्ली


Image result for रावते

कराड/ प्रतिनिधीः
कोण अमित शाह? मला माहिती नाही, असे म्हणत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीच पत्रकारांना, भाजपचे अध्यक्ष असे तुम्ही म्हणत आहात का, असा प्रतिप्रश्‍न केला. रावते यांनी शाह यांना अनुल्लेखाने म्हटले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूरमध्ये बोलताना शिवसेना सोबत आली, तर सत्ता देऊ नाहीतर अपट देंगे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत कराड येथील नवीन बसस्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर रावते यांनी प्रतिक्रिया दिली. या वेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, हर्षद कदम, उपमहाव्यवस्थापक राहुल थोरो यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

रावते म्हणाले, कोण अमित शाह. मला माहिती नाही. शिवसेना नेहमीच एकटी तयार असते. मी मुख्यमंत्री नाही. त्यामुळे काल मुख्यमंत्री काय बोलले आहेत, ते मला माहीत नाही. मला काही आठवत नाही. शाह बोलले का तुम्ही पत्रकार बोलतात, हे मला माहिती नाही, असे म्हणत त्यांनी शाह यांच्या बाबतच्या विषयांवर बोलणे टाळले. शाह यांना अनुल्लेखाने मारून त्यांना आपण फार महत्व देत नाही, असे रावते यांनी म्हटले आहे. या वेळी चव्हाण हे केवळ मिश्किलपणे हसत होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget