Breaking News

दिलीप शिंदे यांच्या ‘मला शिकायचंय’ आत्मकथनाचे प्रकाशनअहमदनगर : शब्दगंध साहित्य परिषदेचे सदस्य व लेखक दिलीप शिंदे यांच्या ‘मला शिकायचंय’ या आत्मचरित्राचे प्रकाशन राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलनात समाज कल्याण विभागाचे सेवा निवृत्त आयुक्त आर. के. गायकवाड यांनी केले. 
यावेळी प्रसिद्ध विचारवंत व समीक्षक व डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. वासुदेव मुलाटे, माहिती संचालक यशवंत भंडारे, संमेलनाध्यक्ष टी. एस. चव्हाण, भटक्याचे भावविश्‍व चे संपादक के. ओ. गिर्हे, राष्ट्रीय ओ. बी.सी. महासंघाचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते अमिनभाई जामगावकर, प्राचार्य हसन इनामदार, अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे, जगन्नाथ फुलारे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील मूळ रहिवासी असलेले लेखक व सध्या संगमनेर तालुक्यातील आश्‍वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असणारे दिलीप शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षण घेतले. व स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांचा हा संघर्षमय प्रवास त्यांनी ‘मला शिकायचंय’ या आत्मचरित्रातून सविस्तरपणे मांडलेला आहे.  
एकेकाळी शिक्षणापासून वंचित असलेल्या वडार या भटक्या जाती मधील तरुणाला शिक्षण घेण्यासाठी किती अडी अडचणींना सामोरे जावे लागते. आणि त्यातून मार्ग काढून त्यांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी कसे होता येते हा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे.  या आत्मकथनाच्या प्रकाशनानिमित्त लेखक दिपीप शिंदे यांचा भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलनात प्रसिद्ध विचारवंत व समीक्षक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. किशोर साळवे, लेखिका जनाबाई गिर्हे, डॉ. द्रवपदी पंडिलवाद, लता मुसळे, दयाराम गव्हाणे आदी उपस्थित होते.