Breaking News

आसनगावजवळ अपघातात सळवेतील युवक ठार


सातारा (प्रतिनिधी) : आसनगाव (कुमठे) येथे झालेल्या अपघातात सळवे, (ता. पाटण) येथील युवक जागीच ठार झाला असून त्याच्यासोबतचा सहप्रवाशी जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम शंकर गुरव (वय 26, रा. परमाळे, ता. सातारा) हे त्यांचा नातेवाईक युवक स्वप्निल पुजारी (वय 22, रा. सळवे, ता. पाटण) याच्यासोबत दुचाकीवरून सातार्‍याकडे जात होते. त्यावेळी आसनगाव (कुमठे) परिसरात दुचाकी आणि एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. त्यामध्ये स्वप्निल पुजारी हा जागीच ठार झाला. तर या अपघातात जखमी झालेल्या शांताराम शंकर गुरव यांच्यावर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शांताराम गुरव हे येथील परांजपे कंपनीत काम करतात. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रथम त्यांनी कंपनीत मशीन ऑपरेट करताना चक्कर येऊन पडलो अशी माहिती रूग्णालयातील पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ते अपघातातील जखमी असल्याचे स्पष्ट झाले. सातार्‍यात दीड वर्षाचे बालक भाजल्याने जखमी सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : येथील यादोगोपाळ पेठेतील दीड वर्षाचा एक मुलगा भाजून जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव अनिल जंगम, (वय दीड वर्ष) हे बालक आज सकाळी घरात खेळत होते. त्यावेळी खेळता खेळता चहा असलेल्या पातेल्यावर पडल्याने अथर्व भाजून जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.