Breaking News

वंजारवाडीत बिबट्याच्या हल्ला तीन शेळ्यांचा बळी


सोनई/प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील वंजारवाडीच्या शिवारात गट क्र. 160 मध्ये एका बिबट्याने दिवसाढवळ्या बाबासाहेब त्रिंबक डोळे यांच्या तीन शेळ्यांचा अक्षरशः फडशा पाडला. त्यामुळे  डोळे कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोळे कुटूंब राहत असलेल्या घरासमोर पाटालागत चारा खाण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास शेळ्या सोडल्या होत्या. त्या चरत असताना अचानक बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढवला, त्यात तीन शेळ्या जागीच मृत्यू मुखी पडल्या.


शेळ्यांचा आरडा ओरड चालू असताना तेथील सुमन डोळे, व अर्जुन डोळे यांनी पाहताच बिबट्याने धूम ठोकली. सदर हा बिबट्या एकटा नसून दोन-तीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून अनेक ांनी धास्ती घेतली आहे. यामध्ये डोळे कुटूंबाचे 30000/-रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्याची मागणी बाबासाहेब डोळे यांनी करून इतर क ोणाची आर्थिक हानी होऊ नये म्हणून वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. या घटनास्थळी वनखात्याचे अधिकारी ढेरे यांनी समक्ष  भेट देऊन पाहणी केली. तसा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेहत्रे, डॉ. खिलारी यांनी केला असून रितसर नुकसान भरपाई प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.