Breaking News

अल्पवयीन मुलीचे अपहरण गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- गेवराई येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असुन अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई येथील पपीया गोमत बिश्‍वास (वय १७) या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. पपीया बिश्‍वास ही घरी परत न आल्याने तिच्या कुटूंबियाने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. यानंतर बिश्‍वास कुटूंबियांनी थेट गेवराई पोलिस स्टेशन गाठून सर्व हकीकत सांगितले. यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.