Breaking News

गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी पोहेगांवातुन लोकसहभाग उभारणार ः औताडे


कोपरगाव.प्रतिनिधी 
पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती या मुद्यावर सन 2013 साली मुंबई येथे आझाद मैदानावर गोदावरी कालव्यांच्या रोटेशन मिळण्याबरोबर कालव्यांच्या नूतनीकरणासाठी कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना बरोबर घेऊन आम्ही उपोषण व आंदोलन केले होते. राहाता येते कालवा सल्लागार समितीच्या सभेमध्ये लोकसहभागातून कालव्यांची कामे हाती घ्यावे म्हणून भूमिका मांडली होती. 

त्यावेळी तसे पत्रही शासनाकडे पाठवले होते मात्र त्यावेळी हा विषय गांभीर्याने हाताळला गेला नाही. 2001 साली 350 कोटी रुपये कालवा नूतनीकरणाचे बजेट होतं मात्र ते आता एक हजार रुपये कोटी रुपयांवर जाऊन ठेपलं त्यामुळे जीर्ण झालेल्या कालव्यांची कामे होणार का नाही असा प्रश्‍न उभा होता मात्र नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची नाम फाऊंडेशन, टाटा फाऊंडेशन, रविशंकर भक्त मंडळ व जलसंपदा खात्याच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून गोदावरी कालवे नुतनीकरणाचा प्रोजेक्ट तयार झाला त्यामुळे या कालव्याची कामे होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 

कालवे परिसरातील भौगोलिक परिस्थितीवर शेतकरी वर्गाचा अर्थकारण अवलंबून होतं ब्रिटिश सरकारने गोदावरी कालव्याची निर्मिती करून कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांचा तीन पिढ्यांचा उद्धार झाला. लोकसहभागातून हे काम होणार असल्याने पोहेगांव ही त्याबाबतीत कुठेच मागे राहणार नाही लोकसहभागातून पोहेगांव परिसरातील ओढ्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविले, त्यामुळे हरितक्रांती घडली गोदावरी कालव्याचे रुंदीकरण झाल्यावर आता मिळणारे गोदावरी कालव्याचे दोन-तीन रोटेशनचे रूपांतर नक्कीच पाच ते सहा रोटेशनमध्ये होईल व शेतकरी समृद्ध होईल त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणासाठी मोठा लोकसहभाग उभा केला जाईल. असे प्रतिपादन शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी केले