Breaking News

निर्भिड व स्वाभिमानी पत्रकारांचा सन्मान होतोच - गडाख


तुकाराम गडाख साठी इमेज परिणामभातकुडगाव फाटा/प्रतिनिधी
महंत सुनिलगिरी व मा.पोलीस अधीक्षक गवारे यांच्या हस्ते पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार 2019 रवींद्र उगलमुगले यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मा. खा. तुकाराम गडाख यांनी असे प्रतिपादन केले की, देशामध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. हुकुमशाही सरकारा विरुद्ध कुणीही ठोस असे का बोलत नाही. शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरत आहे. शेती मालाला योग्य बाजारपेठ न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. पत्रकारांनी स्वाभिमान व निर्भिडपणे समाजासमोर प्रश्‍न मांडून ते सोडवावे.
भातकुडगाव फाटा येथे कामधेनु सहकारी बिगर शेती, दुग्ध व्यवसाय पतसंस्था, बक्तरपुर यांच्यावतीने दिला जाणारा पत्रकारिता ’जीवनगौरव’ पुरस्कार 2019 या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्षपदावरून गडाख बोलत होते. देशातील कोणत्याच घटकाचे पूर्ण समाधान करण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे, तरुणांनी राजकारण समजून त्यामध्ये भाग घेतला पाहिजे, राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी अर्थकारणावर ती अवलंबून आहेत. अर्थकारण हे भांडवलदारांच्या हातात आहे, म्हणूनच मोदी सरकार भांडवलदारांचे लाड पुरवत आहे. याच भांडवलदारांच्या जीवावर ते अजूनही अनेक दशके सत्तेची स्वप्ने पाहत आहेत, परंतु पत्रकारांनी बारीक-सारीक गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करणे म्हणजेच पत्रकार दिन साजरा केल्याचे फलित मिळेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी महंत सुनीलगिरी महाराज, सभापती डॉ.क्षितीज घुले, बाळासाहेब फटांगडे, दत्ता फुंदे, प्रवीण मस्के, चेअरमन मारूती जाधव, चेअरमन बाळासाहेब काळे, एकनाथ काळे, राहुल बेडके, अण्णासाहेब दुकळे, अण्णासाहेब शिंदे, वाय.डी.कोल्हे, अशोक मेरड, जि.प. सदस्य रामभाऊ साळवे, अजय नजन,अशोक दुकळे, रवींद्र लोढे, कडुबाळ जाधव, भाऊसाहेब सामृत, यशोदास वाघमारे, भाऊराव फटांगडे, सचिन काळे, बापूसाहेब लोढे, राजेश लोंढे, मुरलीधर दुकळे, राजेंद्र आढाव, विठ्ठल आढाव यांच्यासह विविध स्तरातील सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे बाळासाहेब काळे यांनी केले, तर आभार रवींद्र मडके यांनी मानले. सूत्रसंचालन शहाराम आगळे यांनी केले.

पत्रकारांचा सन्मान.....
कामधेनु पतसंस्थेच्यावतीने तालुक्यातील पत्रकार बांधवांना शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चौधरी, आर. आर. माने, ज्ञानदेव गवारे, रावसाहेब मरकड, रावसाहेब निकाळजे, दिपक खोसे, रामनाथ रुईकर, रवी मडके, रवी उगलमुगले, शहाराम आगळे, संजय सुपेकर, दादा डोंगरे, बाळासाहेब पानकर, नानासाहेब चेडे, माऊली लोढे, सज्जात पठाण, ज्ञानेश्‍वर जवरे, सुनील नजन, दादा पाचरणे, अक्षय केदार, अजय माने, सुनील पाठक, अजय कोकाटे, शुभम आदी. पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.