Breaking News

देवगावात बिबट्याने घेतला तीन शेळ्यांचा बळीभेंडा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील देवगांवात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सायंकाळी साडेसात 7.30 च्या सुमारास संभाजी सोनवणे हे जेवण करत असताना बाहेरून बकरी ओरडण्याचा आवाज आला म्हणून डोकावून पाहिले असता, बिबट्याने तीन बकर्‍यांचा अक्षरशः नरडी बळी घेतल्याचा फोडून ताव मारतांना दिसला. 

असा प्रकार देवगाव येथील संभाजी कारभारी सोनवने यांच्या वस्तीवर रविवारी रात्री 7.30 च्या दरम्यान घडला. सदरील घटना घडल्यापासून आजपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी उपस्थित झाले नाही. कुकाणा पशुवैद्यकीय अधिकारी हाकेच्या अंतरावर राहत असताना देखील अशा घटना घडतात. वनखात्याने पिंजरा लावला परंतु चुकीच्या पद्धतीने लावला गेला वनखात्याच्या अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पिंजरा लावला आहे. याबाबत वनविभागाने तात्काळ दखल घेऊन उपायोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.